खंडाळा येथे ५ सप्टेंबर रोजी प्रथमेश गावणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

विल्ये दि. १ सप्टेंबर (अमित कांबळे) :- तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गोपाळ गावणकर यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या” जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ” शनिवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता खंडाळा (स्वप्नपूर्ती हॉटेल नजीक) आयोजित करण्यात आला असून, या उद्घाटन समारंभाला खंडाळा पंचक्रोशीतील तमाम शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर व ग्रामस्थ बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख व निमंत्रक प्रथमेश गावकर यांनी केले आहे.
प्रथमेश गावणकर हे गेल्या दहा वर्षाहून अधिक काळ रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, मजुरांच्या, तसेच आरोग्याच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहे .याच उद्देशाने त्यांनी बरोबर सहा महिन्यापूर्वी आपले जनसंपर्क कार्यालय चालू केले. परंतु मागील सहा महिन्यातील कार्यालयात येणाऱ्या लोकांचा वाढता ओघ पाहता याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेने सामाजिक प्रश्नांवर अधिक सक्षमतेने काम करण्यासाठी तसेच “जनसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांना कायदेशीर मार्गाने वाचा फोडण्यासाठी “या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
हा नूतनीकरण सोहळा परिसरातील आपल्या सर्वांच्या समवेत अधिक द्विगुणित करावा या उद्देशाने या कार्यालयाचा नूतनीकरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमास सहकार्य करावे असे आवाहन जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गावणकर यांनी केले आहे .
संस्थापक – प्रथमेश गावणकर जनहित फाउंडेशन. संपर्क क्रमांक ९४२२०७७३०९.



