वरवडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी कुलदीप जाधव यांची बिनविरोध निवड!

गणपतीपुळे दि. २८ ऑगस्ट (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील वरवडे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी कुलदीप अनंत जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
वरवडे बौद्धवाडीला तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाचा बहुमान पहिल्यांदा देण्यात आला असून कुलदीप अनंत जाधव हे वरवडे बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ३० चे विद्यमान अध्यक्ष आहेत. तसेच वाटद खंडाळा दीक्षाभूमी येथील बावीस खेडी बौद्धजन संघाचे ते चिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर अनेक क्रीडा, शैक्षणिक ,सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक कार्यातील ते सक्षम आणि क्रियाशील युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
वरवडे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या माध्यमातून अध्यक्षपदाचा हा पहिलाच बहुमान कुलदीप अनंत जाधव यांच्या स्वरूपात मिळाला असल्याने वरवडे बौद्धवाडीला मिळाल्याने त्यांचा वरवडे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 30, आदर्श महिला मंडळ व न्यू भीमस्टार मंडळाच्या आणि वाडीतील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यथोचित सन्मान करण्यात आला.
दरम्यान, वरवडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नव्याने निवड झाल्याबद्दल त्यांचे वरवडे येथील सर्व ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील विविध संस्था, संघटनांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.



