
दापोली दि. २६ ऑगस्ट :- दापोली शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूलच्या विद्याभारती विभागाने कोकण प्रांत खेलकुद स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली आहे. नुकत्याच अंबरनाथ येथे संपन्न झालेल्या विविध क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये १७ वर्षाखालील बॅडमिंटन मुले प्रथम क्रमांक सहभागी खेळाडू -वरद वैद्य,अमोघ जोशी, स्नेहराज राठोड.
मल्लखांब १४ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक सहभागी खेळाडू
प्रज्ञेश शिंदे.
मल्लखांब १७ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सहभागी खेळाडू स्वराज मांजरे.
मल्लखांब १७ वर्षाखालील मुली सहभागी खेळाडू –
समृद्धी धाडवे – प्रथम क्रमांक,
वेदा खंकाळ – द्वितीय क्रमांक, ऋतुजा पवार – तृतीय क्रमांक.
मल्लखांब १९ वर्षाखालील मुली सहभागी खेळाडू –
पल्लवी भुवड – प्रथम क्रमांक.
बुद्धिबळ 14 वर्षाखालील मुले सहभागी खेळाडू-
वेदांत भागवत – प्रथम क्रमांक,
अर्जुन वालावलकर – चतुर्थ क्रमांक, आराध्य पास्ते – सातवा क्रमांक.
बुद्धिबळ 14 वर्षाखालील मुली सहभागी खेळाडू –
सिया कुलकर्णी -प्रथम क्रमांक,
तन्मया डोंगरे- तृतीय क्रमांक,
१७ वर्षाखालील कबड्डी मुले द्वितीय क्रमांक सहभागी खेळाडू – रुद्र जाधव, अवधूत शिगवण, स्वराज जोशी,साई भांबीड, सागर पवार, निर्वाण गोरीवले, ओम वारणकर, जय पांगारकर, करण भैरमकर, सार्थक भांबीड,विराज दाभोळकर, सर्वेश पुलेकर.
१४ वर्षाखालील कबड्डी मुली तृतीय क्रमांक सहभागी खेळाडू – सार्थकी दाभोळे, सई पाते, वनश्री पाष्टे, काव्या झगडे, स्वरा होगले, श्राव्या कुंबेटे, सुरभी परांजपे, सानवी दुबळे, सिया धोत्रे, सावी भोसले, स्वरा मोरे,अस्मि गोवले.
बॅडमिंटन, बुद्धिबळ व मल्लखांब मध्ये सहभागी सर्व खेळाडूंची खेळकुद विद्याभारती पश्चिम क्षेत्र विभागीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे. वरील सर्व खेळाडूंनी विद्याभारती क्रीडा प्रमुख श्री. शैलेश मिसाळ, श्री.विजय भुवड, क्रीडा शिक्षक श्री. प्रथमेश दाभोळे, कु.आकांक्षा अस्वले, सौ.प्रिया पास्ते व कु. ऋतुजा बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखालील सुयश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद करमरकर, सेक्रेटरी डॉ. विनोद जोशी, शालेय समिती चेअरमन रवींद्र कालेकर, सदस्या सौ.स्मिता सुर्वे तसेच सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद कांबळे, उपमुख्याध्यापक मगदूम एस.आय. पर्यवेक्षक अनिल पेठकर, पर्यवेक्षिका सौ. सोनाली मेहंदळे, विद्याभारती समन्वयक सौ.स्वरदा थोरात तसेच शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.



