
रत्नागिरी दि. ४ सप्टेंबर :- टिळक आळी गणेशोत्सव मंडळ श्री मारुती पिंपळपार देवस्थान यांच्या तर्फे गतवर्षी प्रमाणे यंदाही रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व चेसडोटस अकॅडमी, रत्नागिरी यांच्या सहकार्याने भाद्रपद गणेशोत्सवाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेसाठी रोख रक्कम व चषक अश्या स्वरुपात एकूण रु. २००००/- ची रोख बक्षिसे असून खुल्या गटासह ८ वर्षे, १० वर्षे, १२ वर्षे व १४ वर्षाखालील गट अश्या विविध वयोगटांतील मुलांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच वय १५ – ३५, ३६-५५ व ५५ वर्षावरील गट व सर्वोत्कृष्ठ महिला खेळाडूंना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर स्पर्धा दि. ०६ सप्टेंबर रोजी वैद्य मंगल कार्यालय, टिळक आळी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
गतवर्षी मंडळाकडून आपल्या शताब्दी वर्षानिमित्त या स्पर्धेला सुरुवात झाली होती. त्या स्पर्धेत एकूण १०५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यातील २० खेळाडू हे फिडे मानांकित खेळाडू होते. या स्पर्धेनंतर लगेचच जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत होणाऱ्या शालेय तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धा होत असल्याने सर्व खेळाडूंना या स्पर्धेतून प्रत्यक्ष स्पर्धेत सरावाची नामी संधी मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. स्पर्धेत नावनोंदणी साठी श्री. उपेंद्र खेर ९४२१०६३५७७ यांचेशी संपर्क साधावा.
सदर स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन उत्सव समितीचे सचिव व स्पर्धा प्रमुख श्री. उपेंद्र खेर, मंडळाचे विश्वस्थ श्री. शशिकांत काळे, श्री. मंदार खेर, श्री. प्रभाकर करमरकर श्री. अरुण करमरकर यांनी केले आहे.



