रत्नागिरी

गोडबोले विद्यामंदिरात विविध उपक्रमांनी संस्कृत सप्ताह साजरा

रत्नागिरी दि. ४ सप्टेंबर : केळ्ये येथील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात संस्कृत शिक्षिका सौ. सानिका पंडित यांच्या नियोजनानुसार संस्कृत सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

दैनंदिन वापरातील वस्तू, शालेय साहित्य, फुले, फळे व त्यांची संस्कृत नावे असे प्रदर्शन मांडले. यात ४० वस्तूंचा समावेश यामध्ये होता. त्यानंतर संस्कृतमधील सुमारे पन्नास पुस्तकांचे पुस्तक प्रदर्शन मांडण्यात आले. इयत्ता दहावीतील श्रावणी केळकर हिने संस्कृतमधून स्त्रियांचे महत्व सांगितले. गार्गी केळकर हिने नारळी पौर्णिमा सणाची माहिती संस्कृतमधून सांगितली. आठवीतील विभूती धुमक हिने हस्तकुटुंबकं गीत सादर करून हाताच्या पाच बोटांची नावे सांगितली. पूर्वा पवार हिने सत्यप्रिय : काष्ठीक: ही कथा सांगितली. नववीतील वंशिका लिंगायत हिने विविध संस्थांची संस्कृत बोधवाक्य सांगितली.

समारोपावेळीही विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात पूर्वा पवारने १ ते ५० संख्या संस्कृत भाषेत म्हणून दाखविल्या. विभूती धुमकने संस्कृत प्रतिज्ञा म्हटली. गार्गी सोलकरने मम परिचय सांगितला. तसेच विभूती व दुर्वा पाटील यांनी मम देशो भारतं गीतावर नृत्य सादर केले. गार्गी व श्रावणी या दोन विद्यार्थीनी संस्कृत भाषेत विनोद सांगितले. लावण्या मोरे व अस्मि पाटील यांनी संस्कृत भाषेत कृषीवल: विषयी माहिती सांगितली. त्यानंतर संस्कृत भाषेत अंताक्षरी घेण्यात आली. यामध्ये एकूण पाच गट सहभागी झाले. ही अंताक्षरी अत्यंत चुरशीची झाली. विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button