रत्नागिरी

रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी व शिक्षण समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे १२ जुलैला गुणवंतांचा गौरव व करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

विल्ये दि. १० (अमित कांबळे) :- रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी व शिक्षण समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यावर्षीही समाजातील इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा ” गुणगौरव समारंभ व करीअर मार्गदर्शन मेळावा”रविवार दिनांक १२जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी आंबेडकरवाडी येथील बुद्ध विहारात आयु. प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभाला प्रमुख अतिथी करिअर मार्गदर्शक ॲड.राकेश सुनिता तुकाराम सत्वे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे ,सचिव सुहास कांबळे, सहसचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, शिक्षण समितीचे अध्यक्ष सेवाभावी कार्यकर्ते जेष्ठ नागरिक जयवंत कदम गुरुजी ,सेक्रेटरी काशिनाथजी तांबे गुरुजी,भीम युवा पॅंथरचे लढवय्ये अध्यक्ष प्रितमजी आयरे, महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर व पदाधिकारी, बौद्धाचार्य गण, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

बौद्धजन पंचायत समितीचे वतीने दरवर्षी या स्तुत्य व अनुकरणीय उपक्रमाचे रत्नागिरी शहरातील नजीकच्या १९ बौद्धजन पंचायत समितीचे शाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी शहरात आयोजन केले जाते.

तर बावीस खेडी बौद्धजन संघटना वाटद खंडाळा येथे ग्रामीण भागातील १९ शाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ खंडाळा बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात येत असतो.यावर्षी रविवार दिनांक १९ रोजी वाटद खंडाळा दीक्षाभूमी बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभाला प्रमुख मार्गदर्शक रत्नागिरी येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व प्रशिक्षक अकॅडमीचे ऍड.राकेश सुनिता तुकाराम सत्वे उपस्थित मान्यवर व विद्यार्थीवर्गाला अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.

तरी रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे गाव शाखा पदाधिकारी, महिला मंडळ पदाधिकारी,पालक विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, सेक्रेटरी सुहास कांबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button