रत्नागिरी

देवरुख नगरपंचायत प्रारूप विकास योजनेवरील सूचना व हरकतींच्या सुनावणीचे आयोजन

देवरुख दि. १० ( सुरेश सप्रे) :- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २६(१) अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या देवरुख नगरपंचायत प्रारूप विकास योजनेवर लेखी प्राप्त सूचना व हरकतींच्या अनुषंगाने, संबंधित हरकतदारांची सुनावणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम २८ (२) अन्वये गठित नियोजन समितीसमोर आयोजित करण्यात आली आहे.

सदर सुनावणी मंगळवार, दि. १४/०७/२०२६ व बुधवार, दि. १५/०७/२०२६ रोजी देवरुख नगरपंचायत कार्यालय, देवरुख येथे आयोजित आली आहे. ज्या हरकतदारांनी देवरुख नगरपंचायत प्रारूप विकास योजनेबाबत सूचना / हरकती लेखी सादर केल्या आहेत, त्यांनी त्यांना पत्राद्वारे कळविण्यात आलेल्या दिनांक व वेळेनुसार आवश्यक कागदपत्रांसह देवरुख नगरपंचायत कार्यालयात सुनावणीस उपस्थित राहून नियोजन समितीसमोर आपले म्हणणे मांडावे.

सर्व संबंधित हरकतदारांनी निर्धारित वेळेचे पालन करून सुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button