रत्नागिरी
रत्नागिरीत जोरदार पाऊस; रस्त्याच्या कामामुळे खालचा फगरवठार येथील काही भागात माती आली वाहून; घरांना धोका!

रत्नागिरी दि. २३ :- रत्नागिरी शहरात आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, या पहिल्या पावसात रत्नागिरी शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. रत्नागिरी शहरातील खालचा फगरवठार येथील पाटणकर आणि दीक्षित यांच्या घरच्या अंगणात पाणी माती चिखल वाहून आला. रस्त्याच्या कामामुळे या परिसरातील काही घरांना धोका निर्माण झाला आहे.
कालपासून रत्नागिरीत पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. रात्रभर सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी जलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यांची सुरू असणाऱ्या कामाचा फटका खालचा फगरवठार येथील काही घरांना बसला आहे.
खालचा फगरवठार भागात तेथील वाडीमध्ये घरांच्या बाजूला चिखल झाला आहे. हाय वे कामाने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.



