रत्नागिरी
जि. प. शाळा करंबेळे शेवरवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप

संगमेश्वर दि. २२ ( प्रतिनिधी ):- जिल्हा परिषद शाळा करंबेळे शेवरवाडी व शाळा करंबेळे या दोन्ही शाळेत शैक्षणिक साहित्य व दप्तर वाटप कार्यक्रम करंबेळे गावाचे दानशूर व्यक्ती नितीन पवार यांच्या सौजन्याने करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कोमल देवळे सरपंच मानसी बारगुडे पोलीस पाटील पांडुरंग खाके, प्रकाश खाके,सान्वी जाधव, अमिषा खाके तसेच सर्व पालक वर्ग उपस्थित होते
शाळेच्या वतीने देणगीदार नितीन पवार यांना धन्यवाद देण्यात आले.


