रत्नागिरी

पदवीधर सेल, भाजप रत्नागिरी दक्षिणतर्फे होणार ११ गुणवंत शिक्षकांचा सन्मान

रत्नागिरी दि. ४ सप्टेंबर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, पदवीधर सेल, रत्नागिरी दक्षिण तर्फे जिल्ह्यातील 11 गुणवंत शिक्षकांचा शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अष्टपैलू विद्यार्थी घडवण्यासाठी कला, क्रीडा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या शिक्षकांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.

पदवीधर सेलचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि संयोजक मनोज पाटणकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार आहे. सर्वच शिक्षक सन्मानास पात्र असले तरी, विशेष कार्य करणाऱ्या शिक्षकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी पदवीधर सेल यांच्या माध्यमातून सन्मानित होणारे शिक्षक पुढीलप्रमाणे असणार आहेत.

1. श्री. योगेश दत्ताराम कदम – दामले विद्यालय, र.न.प.शाळा

2. सौ. अपर्णा प्रतापसिंह जमादार – GGPS, कला शिक्षिका

3. श्री. योगेश गजानन शेट्ये – मुख्याध्यापक, महात्मा गांधी विद्यामंदिर, हरचेरी-उंबरे

4. सौ. प्राजक्ता प्रकाश कदम – मुख्याध्यापिका, कृ.चि. आगाशे विद्यामंदिर

5. श्री. सुनील सिताराम गोठणकर – जि.प. केंद्रशाळा, वाशी, संगमेश्वर

6. डॉ. विनय विलास होडे – जि.प. आदर्श शाळा, हातीव नं. 1

7. सौ. निलीमा दिपक गोरे – जि.प. शाळा, तेरवण, राजापूर

8. श्री. विनोद शशिकांत मयेकर – क्रीडा शिक्षक, रा.भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी

9. श्री. हणमंत विठ्ठल ऐवळे – ल. गो. पटवर्धन विद्यामंदिर, रत्नागिरी

10. सौ. भारती दत्ताराम सुर्वे – गद्रे इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण

11. सौ. स्नेहा संदीप भागवत – गद्रे इंग्लिश मिडियम स्कूल, चिपळूण

सर्व सन्मान प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले असून, हा सन्मान सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच होणार आहे. कार्यक्रमाची तारीख, वेळ आणि स्थळ लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही आयोजकांनी कळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button