रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

रत्नागिरी दि. ४ सप्टेंबर (स्नेहल नलावडे ) :- जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी 10 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांनी या निवडीला अंतिम मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सौं.मनीषा जगदाळे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षा सौं.अस्मिता केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी सौं.वैदेही रानडे यांच्या वतीने हे पुरस्कार उद्याच्या शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आज जाहीर करण्यात आले आहेत.
तालुकानिहाय निवड झालेले आदर्श शिक्षक पुढीलप्रमाणे—
1. मंडणगड – निलेश तुळशीराम लोखंडे, उपशिक्षक जि.प.मराठी शाळा तिडे आदिवासीवाडी
2. दापोली – दिनेश कानू चिपटे,उपशिक्षक जि.प. आदर्श शाळा भरणे कोंडारण
3. खेड – श्रीमती दिप्ती दिलीप यादव, पदवीधर विषय शिक्षिका जि.प. शाळा माणी नंबर 01
4. चिपळूण – विनोद जानू हुंबरे, पदवीधर शिक्षक जि.प.शाळा चिवेली वरची
5. गुहागर – प्रभू रघुनाथ हबर्डे , उपशिक्षक जिल्हा परिषद आदर्श शाळा वेलदुर घरटवाडी
6. संगमेश्वर – राजेश अर्जुन सावंत, पदवीधर शिक्षक जि.प.आदर्श शाळा पूर
7. रत्नागिरी – श्रीमती रश्मी राजन वाडेकर, उपशिक्षिका जि.प. शाळा शिवार आबेरे नंबर 02
8. लांजा – दिलीप शंकर चव्हाण, पदवीधर शिक्षक जि.प.आदर्श पन्हळे नंबर 01
9. राजापूर – श्रीमती स्नेहा सुहास काडगे , उपशिक्षिका जि.प. आदर्श शाळा पाथर्डे
याशिवाय कला पुरस्कार (विशेष पुरस्कार) म्हणून संगमेश्वर तालुक्यातील संदेश प्रकाश झेपले, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा साडवली सह्याद्रीनगर यांची निवड करण्यात आली आहे.
या सर्व शिक्षकांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



