प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई येथे जन आरोग्य समितीची सभा संपन्न

रत्नागिरी, दि. ४ सप्टेंबर : रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जन आरोग्य समितीची सभा जन आरोग्य समिती अध्यक्ष महेंद्र श्रीकृष्ण झापडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका आरोग्य अधिकारी तथा जन आरोग्य समितीच्या सहअध्यक्षा डॉ. शीतल सूर्यवंशी, जन आरोग्य समिती सचिव तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामसुंदर मोरे तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
सभेस पंचायत समिती सदस्य संयोग संजीव दली, पंचायत समिती सदस्य श्रीमती कांचन नागवेकर, जन आरोग्य समिती सदस्य भिकाजी यशवंत शिनगारे, समीक्षा सचिन तळेकर, सुधाकर ज. मुरकुटे,,दीपश्री दिगंबर पाटील, विदुला सुरेंद्र शिंदे, दत्ताराम धाकातू येरीम, शीला पांडुरंग जाधव, प्रीती पराग भाटकर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र चांदेराई येथे नागरिकांना दर्जेदार व प्रभावी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध निधीचा योग्य विनियोग, विविध आरोग्य सुविधांचे नियोजन व आवश्यक बाबींवर यावेळी सर्वांगीण चर्चा करण्यात आली. तसेच आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ६ राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या १३ विविध आरोग्य सुविधांबाबत समितीसमोर माहिती सादर करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी वैद्यकीय अधिकारी तथा जन आरोग्य समिती सचिव डॉ. श्यामसुंदर अनंत मोरे आणि तालुका आरोग्य अधिकारी तथा जन आरोग्य समिती सहअध्यक्षा डॉ. शीतल रामेश्वर सूर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन व शब्दसुमनांनी स्वागत केले.
नागरिकांना त्यांच्या गावाच्या परिसरातच गुणवत्तापूर्ण, सुलभ व लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जन आरोग्य समितीच्या माध्यमातून आरोग्य संस्थांच्या विकासाला चालना देण्यात येत आहे.



