
देवरुख दि. १७ (सुरेश सप्रे) :- देवरुख शहराच्या प्रवेशद्वारावर चोरपऱ्या जवळ उद्योजक मदन मोडक यांनी प्रतापसूर्य बाजीराव पेशवे उद्यानाची निर्मिती केली. याचा लोकार्पण सोहळाही पार पडला. या उद्यानात लढवय्या प्रतापसूर्य बाजीराव पेशवे यांचा अश्वारुढ पुतळा बसवून त्याची शोभा वाढवावी या हेतुने बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा देवरुखात दाखल ही झाला. परंतु त्याला परवानगी न मिळाल्याने तो पुतळा बसविण्यात आला नाही. सदर महापुरुषांच्या पुतळा उभारणीला खास बाब म्हणून परवानगी मिळावी यासाठी मदन मोडक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन दिले. प्रसंगी पुतळ्यासाठी योगदान देणार्या संस्थेचे कुंदन साठ्ये व नगरकर उपस्थित होते.

देवरुख शहरात चोरपऱ्या जवळ प्रतापसूर्य बाजीराव पेशवे उद्यानाची उभारणी झाली.याच उद्यानात पेशवे यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या तसेच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणार्या पेशवे यांच्या अश्वारुढ पुतळ्याची उभारणी लकरच करण्यात येणार आहे. पुतळा उभारणीसाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून अंतिम परवानगी लवकरच मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे पुतळा उभारणीचे काम मार्गी लागले, असा विश्वास मदन मोडक यांनी सांगितले व्यक्त केला. आता हा पुतळा कधी उभारला जातो याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.



