रत्नागिरी

मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान निबंध स्पर्धा; निबंध पाठविण्याचा अंतिम दिवस ३१ ऑगस्ट

रत्नागिरी दि. १२ ऑगस्ट : विज्ञान लेखनाला प्रोत्साहन तसेच विज्ञान व्यक्त करण्यासाठी, मराठी भाषा समृद्ध करण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेतफे राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थी गटासाठी (इ. १२वी पर्यंत) ‘घरातील रसायनशास्त्र’ आणि खुल्या गटाकरिता ‘युद्धाचे हवामानावर परिणाम’ हे विषय ठेवण्यात आले आहेत.

या स्पर्धेसाठी निबंध दि. ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाठवावेत. ए-४ आकाराच्या कागदावर केवळ मराठी भाषेत हाती लिहिलेला अथवा टाइप केलेला असावा. निबंधाची शब्दमर्यादा १५०० ते २००० शब्द असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपले निबंध डॉ. उमेश संकपाळ, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग; द्वारा रसायनशास्त्र विभाग किंवा डॉ. विराज चाबके, कोषाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभाग; द्वारा वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी- ४१५६१२ या पत्त्यावर पाठवावेत.

स्पर्धा विनाशुल्क असून विभागीय स्तरावरील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. अधिक माहितीकरिता http://mavipa.org किंवा https://gjcrtn.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button