रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण दि. १४ : रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने चिपळूण येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरास जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा अमरावतीच्या सीमा बोके होत्या. प्रमुख प्रशिक्षक म्हणून लेखक व व्याख्याते प्रेमकुमार बोके यांनी मार्गदर्शन केले. तसेच विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई-पाटील यांनी महिला सक्षमीकरण बद्दल आणि आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षा अनुजाराजे भोसले यांनी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या कार्याबद्दल तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्षा स्नेहल चव्हाण यांनी जिल्ह्यातील संघटने बद्दल मार्गदर्शन केले.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांनी संघटन वाढीसाठी विशेष मार्गदर्शन केले. संघटना कशी असावी, तिची ध्येये आणि उद्दिष्टे कोणती असावीत तसेच ती प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोणती भूमिका पार पाडावी, याविषयी प्रेमकुमार बोके यांनी अत्यंत सोप्या, प्रभावी आणि प्रेरणादायी भाषेत मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शिबिरानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या खेड तालुका अध्यक्षा रोहिणी मोरे यांच्या गृहउद्योग स्टॉलचे उद्घाटन प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा स्नेहल चव्हाण यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून गृहउद्योग करणाऱ्या महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमादरम्यान शहर उपाध्यक्षा अपूर्वा गायकवाड यांनी दिलेल्या जोशपूर्ण शिवगर्जनेमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर, नेटके व प्रभावी सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्षा विभावरी जाधव यांनी केले.

प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सचिव पूर्वा तांदळे, जिल्हा खजिनदार शिवानी भोसले, जिल्हा उपाध्यक्षा विभावरी जाधव, जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. वृषाली सावंत, तालुका संघटक सुकन्या चव्हाण, तालुका उपाध्यक्षा वीणा जावकर, स्मिता खंदारे आणि अनामिका हरदारे यांनी विशेष परिश्रम घेतले. रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी चिपळूण शहराध्यक्षा वर्षा खटके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button