रत्नागिरी
करंबेळे शेवरवाडी शाळेत ग्रामपंचायतीच्या वतीने पौष्टिक आहाराचे वाटप

संगमेश्वर दि. २५ ( प्रतिनिधी ):- करंबेळे तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायत कडून पंधरावा वित्त आयोग अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंबेळे शेवरवाडी व अंगणवाडी मधील सर्व मुलांना बुधवारी पौष्टिक आहार वितरित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी करंबेळे गावच्या सरपंच सौ.मानसी बारगुडे तसेच ग्रामसेविका सौ. मोहिरे, प्रकाश खाके उपस्थित होते.

पौष्टिक आहारा मध्ये काजूगर, खजूर, राजगिरा लाडू याची पॅक प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यात आली . विद्यार्थ्यांच्या पालकांसह कारंबेळे शेवरवाडी प्राथमिक शाळेतर्फे ग्रामपंचायतीला धन्यवाद देण्यात आले. ग्रामसेविका सौ. मोहिरे यांनी शाळेत स्वतः येवून विद्यार्थ्यांजवळ संवाद साधत पौष्टिक आहाराचे वाटप केले.


