रत्नागिरी

चिपळूणात ३० मे रोजी शिवराज भूषण महानाट्य

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात घोड्यावरून शिवाजी महाराज अवतरणार!

चिपळूण दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास आणि त्यांचा पराक्रम नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी श्री शिवराज मंच मालवणतर्फे एक विशेष उपक्रम म्हणून ‘शिवराज भूषण’ हे भव्य महानाट्य शहरात सादर होणार अवतरणार आहे. त्याचदरम्यान शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि दुर्मीळ ग्रंथांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.

यासंदर्भात सोमवारी सांस्कृतिक केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेला निर्माता भूषण साटम, साहित्यिक, नाट्यप्रेमी प्रकाश देशपांडे, संजय शिंदे, समीर शिंदे, दिनेश आंगणे उपस्थित होते. या महानाट्याचे दिग्दर्शक गणेश मेस्त्री यांनी केले आहे तर लेखक रणजित हिर्लेकर हे आहेत.

विशेष प्रकाशयोजना

‘शिवराज भूषण’ हे महानाट्य 30 मे रोजी रात्री 9:30 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे सादर होणार आहे. कवी भूषण यांनी १६७१ मध्ये रायगडावर महाराजांच्या शौर्याचे जे वर्णन आपल्या साहित्यातून केले होते त्याच अजरामर काव्यावर या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. सुमारे 80 पेक्षा अधिक कलाकार, अंगावर शहारे आणणारे संगीत आणि विशेष प्रकाशयोजनेच्या माध्यमातून महाराजांची युद्धनीती आणि अष्टप्रधान मंडळाचे चोख नियोजन प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याची माहिती निर्माता भूषण साटम यांनी दिली.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी आमदार शेखर निकम, कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, भाजपचे रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरुण पिढीला आवाहन

इतिहास केवळ पुस्तकात वाचण्यापेक्षा तो डोळ्यांनी अनुभवल्यास अधिक प्रेरणा मिळते असे मत श्री शिवराज मंचने व्यक्त केले आहे. रत्नागिरीतील तरुण पिढी, विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान जागृत करण्यासाठी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहवे, असे आवाहन मंचतर्फे करण्यात आले आहे.

समजभान म्हणून हे नाटक : प्रकाश देशपांडे

आजच्या धकाधकीच्या व मोबाईलच्या जमन्यात तरुण पिढी व विध्यार्थी वर्ग हरवत चालला आहे त्यांना भानावर आणण्यासाठी, त्यांना नवप्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी समजभान म्हणून हे नाटक करायचे आहे. त्यामुळे तरुणासह विध्यार्थ्यांनीही हे नाटक आवर्जून पाहावे असे आवाहन नाट्यप्रेमी साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी केले आहे.

महाराज घोड्यावरून येणार

या नाट्यप्रयोगाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची इंट्री ही चक्क घोड्यावरून होणार आहे. त्यासाठी प्रयोगाच्या दोन दिवस आदी मालवणहून घोडा चिपळूण येथे आणण्यात येणार आहे. हे खास आकर्षण असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button