रत्नागिरी
रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक; जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे

रत्नागिरी, दि. ३ : महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक स्वराज संस्थेची द्विवार्षिक निवडणूक 2026 रायगड तथा रत्नागिरी तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी एकूण दाखल 6 उमेदवारांपैकी जुईली महेंद्र दळवी यांचे नामनिर्देशन पत्र आज मागे घेण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक गुरुवार 4 जून हा आहे.
जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी 30 मे रोजी 1 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यांचे सूचक विघ्नेश विजय माळी यांनी आज श्रीमती दळवी यांचे नामनिर्देशन पत्र मागे घेतले.


