रत्नागिरीराजकीय

शिवसेना जिल्हाप्रमुख, नवनिर्वाचित जि. प. सदस्य, जिल्हा युवाधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आठवड्यातून एक वार संपर्क कार्यालयात उपस्थित राहणार

रत्नागिरी दि. १० :- शिवसेना नेते, सचिव तथा मा. खासदार श्री. विनायक राऊत यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी संपर्क कार्यालयात जिल्हाप्रमुख व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा युवाधिकारी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आठवड्यातून एक वार उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार श्री. विनायक राऊत यांचे रत्नागिरी यशोधन अपार्टमेंट, अभ्युदय नगर, नाचणे रोड येथील संपर्क कार्यालय येथे रत्नागिरी जिल्हा प्रमुख श्री दत्ताजी कदम, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा संघटक श्री संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्या तथा RDCC बँक संचालक सौ.नेहा माने व जिल्हा युवा अधिकारी श्री प्रसाद सावंत यांना शिवसेना नेते सचिव तथा मा. खासदार श्री विनायक राऊत  यांनी आपल्या कार्यालयात आठवड्यातून एक वार बसून सर्वसामान्य नागरिकांच्या, शिवसैनिकांच्या, पदाधिकाऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्या सोडविल्या जाव्यात. यासाठी खालीलप्रमाणे वार आणि वेळ कळविण्यात येत आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती.

सोमवार दुपारी 12.00 वा. ते दु.02.00 वाजेपर्यंत

सौ.नेहा रविंद्र माने – जिल्हा परिषद सदस्या, लोकसभा महिला संपर्क संघटक, RDCC बँक संचालक

बुधवार दुपारी 12.00 वा. ते दु.02.00 वाजेपर्यंत

श्री दत्ताजी कदम – शिवसेना जिल्हाप्रमुख रत्नागिरी (दक्षिण)

गुरुवार सकाळी 11.00 वा. ते दु.02.00 वाजेपर्यंत

श्री संतोषजी थेराडे – जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हा संघटक रत्नागिरी(दक्षिण)

वार शुक्रवार सकाळी 11.00 वा. ते सायं.05.00 वाजेपर्यंत

श्री प्रसादजी सावंत – युवासेना जिल्हा युवाधिकारी रत्नागिरी (दक्षिण) तथा शिवसेना शहर संघटक रत्नागिरी

तरी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, शिव सहकार सेना, रिक्षा सेना व अंगिकृत संघटनेतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांसह सर्वांनी उपस्थीत राहावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button