रत्नागिरी

जि. प.कळझोंडी नं. १ आदर्श शाळेच्या वर्ग खोलीचा उद्घाटन समारंभ उद्या पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या उपस्थितीत होणार

विल्ये दि. १० :- रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा कळझोंडी नं. १ या शाळेच्या नूतन वर्ग खोलीचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लांजा – राजापूरचे आमदार किरण सामंत, उद्योगपती रविंद्र सामंत, रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन धनावडे, जि.प.सदस्या उषा सावंत, पं.स.सदस्या अनुष्का खेडेकर , सरपंच दिप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार, रत्नागिरी तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन शेळके, गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल, माजी सभापती मेघना पाष्टे, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, कळझोंडी केंद्रांचे केंद्रप्रमुख जयदीप यादव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी कळझोंडी गावातील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जि. प.कळझोंडी नं.१ आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button