रत्नागिरी

नामदेव समाजन्नोत्ती परिषदेचा ११ जानेवारीला देवरूखात जिल्हा मेळावा

देवरूख दि. ५ (सुरेश सप्रे) :- नामदेव समाजन्नोत्ती परिषद या समाजाचा रत्नागिरी जिल्हा मेळावा रविवार दि. ११ जानेवारी  रोजी दुपारी दोन वाजता देवरुख येथील प्रसन्न जेष्ठ नागरिक संस्था सभागृहात संपन्न होणार आहे.

सदर मेळाव्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये श्री संत नामदेव महाराज शिंपी समाजाचाचे जिल्ह्यात निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार असून जिल्ह्याची नूतन कार्यकारणी निवडण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमासाठी नामदेव समाजन्नोत्ती परिषदेचे राज्यध्यक्ष संजय नेवासाकर आणि राज्य कार्यकारणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तरी जिल्ह्यातील शिंपी समाजाच्या सर्व बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भस्मे तालुकाध्यक्ष अशोक कुमटेकर आणि श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज देवरुख यांचेवतीने करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button