रत्नागिरी

राजापूर तालुक्यात आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकरणीची बैठक संपन्न

राजापूर दि. ५ :-  राजापूर तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या कार्यकरणीची महत्त्वपूर्ण बैठक आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीदरम्यान निवडणूक तयारी, संघटन बळकटीकरण, बूथ पातळीवरील कामकाज तसेच कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार किरण सामंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, सर्वांनी एकजुटीने काम करून येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा उंचावण्याचे आवाहन केले.

तालुक्यातील स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि जनतेशी थेट संपर्क वाढवण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीस उपजिल्हा प्रमुख अशपाक हाजू, विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, महिला संघटिका दुर्वा तावडे,जिल्हा संघटक प्रकाश कुवळेकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक नागले, तालुका संघटिका शुभांगी डबरे, भरत लाड, रविद्र नाखरेकर, आबा आडीवडेकर, ॲड.शशिकांत सुतार, सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख,शाखाप्रमुख, महिला आघाडी व युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button