धम्म क्रांती कलामंच रत्नागिरी तालुका शाखेची २९ रोजी जाकादेवी येथे सभा

तरवळ दि. २७ (अमित जाधव) :- रत्नागिरी तालुक्यातील धम्म क्रांती कलामंच रत्नागिरी तालुका शाखेची जनरल सभा रविवार २९ मार्च रोजी जाकादेवी येथे दुपारी २-३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सदर सभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात येणार आहे त्यामध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, दिनांक ८फेब्रुवारी रोजी झालेल्या माता रमाई जयंती कार्यक्रमाचा जमा खर्च वाचन करून मंजुरी घेणे, मासिक सभासद वर्गणी वसुलीचा आढावा घेऊन, वसुली बाबत विचार विनिमय करणे, येणाऱ्या काळात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत विचार करणे, सभेसाठी न येणाऱ्या सदस्या बद्दल विचार करणे व त्यावर मते जाणून घेणे, व अध्यक्षांच्या परवानगी ने येणाऱ्या आयत्या वेळीच्या विषयांवर चर्चा, या व अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर सभा ही जाकादेवी येथील संतोष पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे याची सभासदांनी नोंद घ्यावी व जास्तीत जास्त सभासदांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन धम्म क्रांती कलामंच रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्ष रविकांत पवार तसेच सचिव सतीश कदम यांनी केले आहे.



