रत्नागिरी

महिला विकास कक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी दि. १० :- भारत शिक्षण मंडळाचे, देव-घैसास-कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरीष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्ष व आय क्यू ए सी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्ष प्रमुख सहा. प्रा. आसावरी मयेकर यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांनी कु. गौरवी ओळकर हिने देखील या दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी सौ. संतोषी प्रसाद झाडगावकर व सौ. सुहासिनी शिवदास किल्लेकर यांचा महाविद्यालयाच्या प्र. प्रा. मधुरा पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. झाडगावकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला उपप्राचार्या वसुंधरा जाधव, महिला विकास कक्ष प्रमुख सहा. प्रा. आसावरी मयेकर, सर्व शाखांचे प्रमुख, इतर प्राध्यापक वर्ग व महाविद्यालयातील सर्व शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुष्का नागवेकर या विद्यार्थिनीने केले तर आभार कु. संगिता कांबळे हिने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button