संगमेश्वर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे सह १३ जण दुबईहून मायदेशी परतले

देवरुख दि. ७ :- इस्राईल, अमेरिका-इराणदरम्यानच्या युद्धामुळे हवाई वाहतूक बंद असल्याने दुबईत अडकलेले संगमेश्वर तालुक्यातील सर्व जण गुरुवारी (ता. पाच) सकाळी हैद्राबाद व बेंगलोर विमानतळावर सुखरूप परतले व तेथून विविध वाहनाने घरी आले.
यात देवरुख मधील जेष्ठ पत्रकार सुरेश सप्रे, ज्योती सप्रे, नगरसेविका श्रद्धा इंदुलकर, जितेंद्र निमकर, कृतुजा निमकर, अभिषेक निमकर, मानसी निमकर, साखरप्यातील संदेश (बापू )शेट्ये, सोनम शेट्ये व अन्य चार असे सर्व आपल्या घरी परतले आहेत. तसेच चिपळूण येथील सनी व रुची जागुष्ट्ये हेही चिपळूणला परतले
दुबईत विमानसेवा बंद झाल्याने या सर्वांना हॉटेलमध्ये थांबावे लागले होते. दुबई व केंद्र सरकारने विमान सेवेची सोय केल्यामुळे बुधवारी (ता. चार) एक जण मुंबईत 6जण हैदराबादला 6जण बेंगलोरला विमानाने आले . गुरुवारी ते घरी आले आणि कुटुंबीय, नातेवाइक. व मित्रानी आनंद व्यक्त केला.


