ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा व श्री जाकादेवी मंदिर विश्वस्त संस्थेकडून धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रास वॉटर कुलर भेट
रुग्ण व नातेवाईकांना स्वच्छ व थंड पाण्याची सुविधा उपलब्ध

राजापूर दि. २ :- तालुक्यातील धारतळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा व श्री जाकादेवी मंदिर विश्वस्त संस्था, देवीहसोळ यांच्या सौजन्याने वॉटर कुलर भेट देण्यात आला. या उपक्रमामुळे रुग्ण, नातेवाईक तसेच आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश विचारे, व्यवस्थापक श्री. महेंद्र विचारे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन पतंगे व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी या स्तुत्य उपक्रमामुळे संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम व रुग्णाभिमुख करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे. मंदिर विश्वस्त संस्थेने दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे आरोग्य सेवेत सकारात्मक बळकटी मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



