क्रीडारत्नागिरी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी अपुर्वा किरण सामंत हिची बिनविरोध निवड

रत्नागिरी दि. ३ :- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदी संभाजी राजे आणि अपुर्वा सामंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमध्ये महाराष्ट्रातील क्रिकेट प्रशासनाला नवे नेतृत्व व दिश मिळणार असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात सुरु आहे.

अपुर्वा सामंत या आमदार किरण सामंत यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित व तरुण उद्योजक म्हणून परिचित आहेत. सामाजिक व उद्योजकीय क्षेत्रातील त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय ठरला आहे त्यांच्या निवडीमळे कोकणातील उदयोन्मुख युवक- यवतींसाठी क्रिकेट क्षेत्रात नव्या संधींची दारे खुली होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

विशेषतः कोकण पट्ट्यातील ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे, स्थानिक स्तरावर क्रिकेट अकादमी, प्रशिक्षण सविधा व स्पर्धा वाढाव्यात यासाठी त्यांचा अन्भव उपयक्त ठरेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे. या निवडीमध्ये कोकणातील युवा शक्तीला चालना मिळून, महाराष्ट्र क्रिकेटच्या प्रगतीला गती मिळेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button