रत्नागिरी

कळझोंडी नं.१ आदर्श शाळेत छ.शिरावरायांच्या जयंतीनिमित्त मानवंदना

विल्ये दि. १९ :- रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी नं.१ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

यावेळी विचार मंचावर ग्रामस्थ व वृत्तपत्रकार किशोर पवार, नामदेव वीर, शालेय पोषण आहार विभागाच्या माधवी आग्रे, अंतरा राऊत, शालेय मुख्यमंत्री हर्षदा आग्रे यांच्या समवेत सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थी मनोगत अभिवादन सभा घेण्यात आली. या सभेत वेदिका आग्रे, सुदिक्षा शिंदे,शर्वाणी निंबरे, स्वरा पवार,श्रावस्ती पवार, हर्षदा वीर,रिया बेनेरे,शौर्य सनगरे,विहान राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आपल्या मनोगतातून विविध पैलूंवर भाष्य केले व शिवाजी महाराजांना अभिवादन केले.वृत्तपत्रकार किशोर पवार यांनी ही शिवाजी महाराज यांच्या आदर्श ऐतिहासिक कार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याचा अतिशय अभ्यासपूर्ण आढावा घेतला.

यावेळी त्यांनी राजमाता जिजाऊ, संभाजी महाराज व रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श ऐतिहासिक कारभाराबाबत अतिशय अभ्यासपूर्ण आढावा घेऊन अनेक ऐतिहासिक किल्ले जिंकून,आदर्श समाज निर्माण करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अनेक दाखले दिले. व शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांनी केले.प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय पोषण विद्यार्थ्यांची ऐतिहासिक वेशभूषा करुन प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज की- जय,जय जिजाऊ,जय शिवराय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button