रत्नागिरी

महाविद्यालयीन तरुणीचे संमतीशिवाय मोबाईलद्वारे चोरून छायाचित्रे काढल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन केली कारवाई

रत्नागिरी दि. १५ :- बारावीची परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या  महाविद्यालयीन तरुणीचे संमतीशिवाय मोबाईलद्वारे चोरून छायाचित्रे काढल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे संबंधित आरोपीस ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दिनांक १४/०२/२०२६ रोजी दुपारी सुमारे १४:१० वा. एका महाविद्यालयीन तरुणीने १२ वी बोर्डची परीक्षा दिल्यानंतर रत्नागिरी बस स्थानक येथून घरी जाण्यासाठी बसने प्रवास करत असताना एका इसमाने सिव्हिल हॉस्पिटल बस स्टॉप येथे बस मध्ये चढून तिचा पाठलाग करून तिच्या शेजारी बसत तिच्या संमतीशिवाय मोबाईलद्वारे चोरून छायाचित्रे काढल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन फिर्यादी तरुणीची भेट घेतली व संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली.

पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले आहे व सदर घटनेबाबत संबंधित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८(१) व ७९ अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button