क्रीडारत्नागिरी

बँक ऑफ इंडियाच्या आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा देवरुखात संपन्न

देवरुख दि. १५ ( सुरेश सप्रे) :-  बँक ऑफ इंडियाच्या 14 जिल्हाच्या अंतर्गत “आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा” नुकत्याच देवनगरी देवरुख येथे संपन्न झाल्या.

या स्पर्धेचे उदघाटन संजय कदम झोनल मॅनेजर पुणे, नरेंद्र देवरे झोनल मॅनेजर रत्नागिरी, अंजनी आझाद डेप्युडी झोनल मॅनेजर रत्नागिरी यांच्या हस्ते करण्यात आले. बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन चे जनरल सेक्रेटरी शिरीष राणे, अध्यक्ष विनोद कदम प्रदीप यादव उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत रत्नागिरी, सोलापूर, पुणे, सांगली या महिला व पुरुष संघातील खेळाडूंनी आपल्या उत्तम, बहारदार खेळाने प्रेक्षकांची वाहवा मिळविली .

बँकिंग क्षेत्रात 5 दिवसांचा आठवडा, सरकारी बँकांच्या खाजगीकरणाला विरोध, काम व खाजगी आयुष्य यांचे बॅलन्स साधणे, बँक कर्मचाऱ्यांचे आरोग्य व तंदुरुस्ती जपणे याचा संदेश देण्यासाठी या स्पर्धेच्या दरम्यान अधिकारी संघटनेच्या सभासदांनी कोल्हापूर ते देवरुख बाईक रॅली काढण्यात आली. या रॅली मध्ये शंकर सेन फिल्ड मुख्य महाप्रबंधक स्वतः भाग घेत 100 कि मी बाईक चालवत देवरुखात आले. त्यांचे जोरदार स्वागत नरेंद्र देवरे झोनल मॅनेजर रत्नागिरी यांनी केले.

पुरुष सांघिक संघामध्ये प्रथम क्रमांक रत्नागिरी तर द्वितीय क्रमांक सोलापूर व तृतीय क्रमांक सांगली यांनी पटकावला.

महिला सांघिक संघामध्ये प्रथम क्रमांक सोलापूर तर द्वितीय क्रमांक रत्नागिरी व तृतीय क्रमांक पुणे यांनी पटकावला.

ओपन पुरुष प्रथम क्रमांक सौरभ साहू (सोलापूर ) तर द्वितीय क्रमांक किरण खोपडे (रत्नागिरी) यांनी पटकावला. तृतीय क्रमांक जबीन जोसेफ (रत्नागिरी) व विनोद कुमार मुला (सोलापूर) यांना मिळाला.

महिला ओपन प्रथम क्रमांक सुजल कावळे (सोलापूर ) तर द्वितीय क्रमांक सिवा प्रिया (रत्नागिरी) यांनी पटकावला. तृतीय क्रमांक मयुरी तावडे (रत्नागिरी) व निकिता सोबती (पुणे) यांना मिळाला.

ओपन पुरुष डब्बल प्रथम क्रमांक स्मृती रंजन साहू व रामेश्वर भंडारे (पुणे) तर द्वितीय क्रमांक किरण खोपडे व ब्रिजन्य शर्मा (रत्नागिरी) यांनी पटकावला. तृतीय क्रमांक जबीन जोसेफ व ऋषिकेश गावडे (रत्नागिरी) तसेच उमेश पात्रे व अमित जाधव (सांगली) यांना मिळाला.

ओपन महिला डब्बल प्रथम क्रमांक सुजल कावळे व मधुरा देशपांडे (सोलापूर ) तर द्वितीय क्रमांक सीवा प्रिया व मयुरी तावडे (रत्नागिरी) यांनी पटकावला. तृतीय क्रमांक निकिता सोबती व निशा त्रिभुवन (पुणे) तसेच खुशनुमा शेख व राजश्री कुलकर्णी (सांगली) यांना मिळाला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 14 जिल्यातील बँक ऑफ इंडियाचे उत्कृष्ठ खेळाडू देवनगरी देवरुख सारख्या छोट्याश्या शहरात येत चांगल्या प्रकारे खेळाचे प्रदर्शन केले.

बक्षीस वितरण समारंभ नरेंद्र देवरे झोनल मॅनेजर रत्नागिरी, अंजनी आझाद. अमोल सांगले अध्यक्ष अधिकारी संघटना, प्रमोद शिंदे जनरल सेक्रेटरी. राहुल भालेराव उपाध्यक्ष स्टाफ युनियन पुणे, प्रसाद किरपेकर. शिवाजी शिंदे सह सेक्रेटरी स्टाफ युनियन पुणे, मंगेश प्रभुदेसाई BAST चे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन विनोद कदम बँक ऑफ इंडिया आंचालिक क्रीडा समिती रत्नागिरीचे खजिनदार व स्टाफ युनियन पुणेचे अध्यक्ष यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निखिल साटम सह सेक्रेटरी स्टाफ युनियन पुणे यांनी केले. तसेच या संपूर्ण स्पर्धेला बँक ऑफ इंडिया शाखा देवरुखच्या कर्मचारीवृंदासह तालुका बॅडमिंटन संघटना यांचे सहकार्य चांगले लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button