रत्नागिरी

जयगड येथे गांजाची विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

"मिशन फिनिक्स" अंतर्गत जयगड पोलीस ठाण्याची धडक कारवाई

रत्नागिरी दि. १५ :- तालुक्यातील जयगड येथे गांजाची विक्री करणाऱ्या एका इसमाला जयगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. “मिशन फिनिक्स” अंतर्गत जयगड पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून, याप्रकरणी पोलिसांनी एकूण ₹23,520/- किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये “मिशन फिनिक्स” अंतर्गत अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे दिनांक 13/02/2026 रोजी 20.55 वाजता जयगड पोलीस ठाण्याचे हद्दी मध्ये पेट्रोलींग करीत असताना नांदिवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्या जवळील जे.एस.डब्लु. लेबर कॉलनीच्या कम्पाउंडच्या भितींजवळ एक इसम सॅक घेवून उभा असलेला या पथकाला दिसला व त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यास जागीच दोन पंचांसमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव सिंदु कुमार राम मिस्त्री, मुळ रा. वॉर्ड क्रमांक 11, ददरोजा बेलदौर जिल्हा-खगरीया, राज्य बिहार 852161, सध्या रा. जे. एस.डब्लु. लेबर कॉलनी, नांदिवडे ता. जि. रत्नागिरी असे सांगितले.

या पथकामार्फत लागलीच सिंदु कुमार राम मिस्त्री याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेण्यात आली व या झडतीमध्ये त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या सॅकमध्ये एका काळ्या रंगाच्या प्लॅस्टीकच्या पिशवी मध्ये काळपट हिरवट रंगाचा पाने फुले बोंडे काडया व बिया असलेला उग्रवासाचा (एकूण 734 ग्राम वजनाचा) “गांजा” सदृश्य अंमली पदार्थ असा एकूण ₹23,520/- किमतीचा मुद्दे माल मिळून आला.

आरोपीत सिंटु कुमार राम मिस्त्री याने “गांजा” हा अंमली पदार्थ गैरकायदा विक्रीचे उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगले स्थितीत मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे व त्याच्या विरुद्ध जयगड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 10/2026 एन.डी.पी.एस अॅक्ट 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) ii (अ), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जयगड पोलीस ठाणे करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, जयगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. संजय पाटील व पो.उनि, श्री. विलास दिडपसे, पो.हवा/456 मिलिंद कदम, पो.हवा/305 संतोष शिंदे, पो.शि / प्रितेष लोटणकर या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button