रत्नागिरी
नमनसम्राट यशवंत वाकडे यांचा माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी तर्फे सन्मान

रत्नागिरी दि. १२ :- लांजा तालुका पंचायत समिती खानवली गणातून नमनसम्राट श्री यशवंत वाकडे हे आमदार श्री किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने भरघोस मतानी निवडून आल्याबद्दल महाराष्ट्र राज्यातील पहिलेच माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी या नमन मंडळातील कलाकारानी नमन मंडळाचे लेखक दिग्दर्शक श्री यशवंत वाकडे साहेब यांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.
यावेळी श्री. मदन डोर्लेकर गुरूजी, सौ. वेदा शेट्ये, सौ. विणा भागवत, सौ. शीतल सकपाळ, सौ. रिमा देसाई, सौ. पूनम गोळपकर, सौ. विनया काळप, सौ. सर्वता चव्हाण, सौ. मानसी साळवी, सौ. समिक्षा वालम, श्री. वासुदेव वाघे आदी मंडळीनी पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व कौतुकही केले



