नितिन बांडागळे यांना ‘विश्व समता कलामंच कलाभूषण’ पुरस्कार जाहीर

देवरूख दि. १२ : विश्व समता कला मंच लोवले, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी या संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय विश्व समता कलामंच कलाभूषण पुरस्कार – २०२६ मुरादपूर–देवरूख येथील नितिन बांडागळे यांना जाहीर झाला आहे.
सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, कला, क्रीडा, जल, पर्यावरण तसेच पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता शुभगंधा मंगल कार्यालय, मयुरबाग, लोवले (ता. संगमेश्वर) येथे होणार आहे.
या प्रसंगी मानपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन नितिन बांडागळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांनी केले आहे. या पुरस्कारामुळे नितिन बांडागळे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



