रत्नागिरी

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) टिळक पुण्यतिथीनिमित्त ‘राष्ट्रीय शिक्षण: लोकमान्य टिळकांचे धोरण’ व्याख्यान

रत्नागिरी दि. ३ ऑगस्ट : र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर(स्वायत्त) महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ‘राष्ट्रीय शिक्षण: लोकमान्य टिळकांचे धोरण’ या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत आणि लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून स्मृती अभिवादन, तसेच प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराने झाली. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांसाठीचा बक्षीस वितरण सोहळाही पार पडला यामध्ये लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेल्या होते त्यामध्ये कु. ओंकार आठवले याला प्रथम क्रमांक, कु. मनस्वी नाटेकर या विद्यार्थिनीला द्वितीय क्रमांक आणि कु. सेजल तांबे या विद्यार्थिनीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तसेच त्या व्यतिरिक्त कै. गणेशशास्त्री घाटे पारितोषिक त्याचप्रमाणे मराठी विभागाने दिलेले पारितोषिक हे द्वितीय वर्ष कला शाखेत मराठी विषयात प्रथम येणाऱ्या व तृतीय वर्ष कला शाखेत मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी दिले जाते ते कु. श्रेया श्रीकांत सावंत या विद्यार्थिनीला देऊन तिचा गौरव करण्यात आला.

त्याचप्रमाणे कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक तसेच गणित विभागाने दिलेले पारितोषिक हे प्रथम वर्ष विज्ञान शाखेत गणित विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दिले जाते ते कु. आर्यन दिनानाथ जयस्वाल या विद्यार्थ्याला देण्यात आले. तसेच कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिकआणि गणित विभागाने दिलेले पारितोषिक हे कु. प्रणव महेंद्र कदम या विद्यार्थ्याला देण्यात आले.

प्रमुख वक्ते डॉ. श्रीकृष्ण जोशी व वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य मेजर डॉ. सीमा कदम यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण करण्यात आलेयावर्षीचे आदर्श विद्यार्थी पारितोषिक नील जैन या विद्यार्थ्याला देऊन त्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. अमृता नवाथे यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार तसेच ‘विद्यार्थी ते प्राध्यापक’ असा प्रवास व त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या, कथासंग्रहांबद्दल तसेच शापित या त्यांच्या कादंबरीसाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुरस्कार प्राप्त असलेले प्रसिद्ध वक्ते डॉ. श्रीकृष्ण जोशी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता म्हणून लाभले होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या मेजर डॉ. सीमा कदम या होत्या.

आपल्या व्याख्यानात डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, लोकमान्य टिळकांना केवळ वरवर जाणून घेण्यापेक्षा त्यांचे साहित्य वाचणे आणि समजून घेणे जास्त गरजेचे आहे. त्यांनी टिळकांच्या स्वदेशी, स्वराज्य, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा विशेष उल्लेख केला. देशप्रेमी व स्वाभिमानी पिढी तयार करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी, राष्ट्रीय शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नव्हे तर आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यासाठी नवीन शिक्षण पद्धतीची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. सीमा कदम यांनी नेतृत्व निर्माण करण्यासाठी व स्वराज्याचा हक्क मिळवण्यासाठी विकसित भारतासाठी राष्ट्रीय शिक्षण कसे गरजेचे आहे, यावर भाष्य केले. तसेच लोकमान्य टिळकांचे राष्ट्रीय शिक्षणाबाबतचे विचार आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० यांच्यातील संबंध त्यांनी आपल्या भाषणात विशद केले. कार्यक्रमाचा समारोप प्रा. अमृता नवाथे यांच्या आभार व्यक्त करण्याने झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button