रत्नागिरी

माजी सैनिकांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या पुनर्वसन आणि कौशल्य विकासासाठी १३ फेब्रुवारी रोजी मेळावा

रत्नागिरी दि. १० :- सचिव चौकशी अधिकारी (२), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई व सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे मार्गदर्शन आणि सुचनेनुसार माजी सैनिकांच्या सेवानिवृत्ती नंतरच्या पुनर्वसन आणि कौशल्य विकासासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्यासाठी तसेच प्रशिक्षणानंतर रोजगाराची संधी / उपलब्ध्ता यासंदर्भात सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, कृषी अधिकारी तसेच सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्र, यांच्या मार्फत माजी सैनिक, त्यांचे पाल्य, माजी सैनिक विधवा यांचेसाठी शुक्रवार 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.45 वाजता सैनिक मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

तसेच युद्धजन्य परिस्थितीमध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नीना / अवलंबितांना शासनाची शेतीयोग्य जमीन न मिळालेल्या वीर पत्नींना / अवलंबितांना कशाप्रकारे मदत करता येईल याबाबत सर्व वीर पत्नी / अवलंबित / वीर माता-पिता यांचेशी सविस्तर चर्चा या मेळाव्यामध्ये करण्यात येणार आहे. तसेच ज्या माजी सैनिकांच्या व माजी सैनिक विधवा यांच्या निवृत्ती वेतना संदर्भातील अडचणी असतील त्यांचे निराकरण या मेळाव्यामध्ये करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यास जिल्ह्यातील वीर नारी, वीर माता-पिता, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button