रत्नागिरीराजकीय

जिल्हा परिषद निवडणुकीत राज्यात शिवसेनेला ३०० पैकी १७० जागा : ना. उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यात ५६ पैकी ४१ जागांवर शिवसेनेचा विजय

रत्नागिरी दि. ९ :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्यात शिवसेनेचे ३०० पैकी जवळपास १७० उमेदवार निवडून आले आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात ५६ पैकी ४१ उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आहेत. महानगर पालिकेच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे. त्याचबरोबर आज आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाला रत्नागिरी जिल्ह्याच्या शिवसैनिकांनी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नऊ ही पंचायत समितीचे सभापती ही दिलेली भेट आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी येथे केले.

ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ५६ जिल्हा परिषदेच्या जागा होत्या आणि ११२ पंचायत समितीचे जागा होत्या. या निवडणुकीत शिवसेनेच्या जागा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा निवडून आलेल्या असून , रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेने मतदारांनी भरभरून आम्हाला मतदान केले. त्याच्यामुळे रत्नागिरी तालुक्यामधल्या दहा पैकी दहा जागा जिल्हा परिषदेचे जिंकल्या असून, दापोली मध्ये सहापैकी सहा जागा, खेडमध्ये सहा जागा आम्ही जिंकल्या आहेत. एक जागा अजित पवार एनसीपीला मिळाली आहे. संगमेश्वरमध्ये दोन जागा शिवसेना, एक बीजेपी, एक एनसीपी आणि तीन उबाठाने जिंकल्या आहेत. राजापूरमध्ये सहाच्या सहा जागा शिवसेनेने जिंकल्या असून आणि लांजामध्ये चार पैकी चार जागा जिंकल्या आहेत.

जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद गटापैकी ४१ ठिकाणी शिवसेना जिंकल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच पंचायत समितीवर शिवसेनेचे सभापती विराजमान होतील, असे ना. सामंत यांनी सांगितले. राज्यात शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला असून, ३०० पैकी जवळपास १७० जिल्हा परिषदेच्या जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button