रत्नागिरी

उडान फेस्टिवल 2026 मध्ये देव घैसास किर वरिष्ठ महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश

रत्नागिरी दि. ५ :- मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या वतीने आयोजित उडान फेस्टिवल 2026 मध्ये देव घैसास किर वरिष्ठ महाविद्यालयाने चार विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या फेस्टिवलमध्ये सृजनशील लेखन स्पर्धेत ईश्वरी पवार हिने उत्कृष्ट सादरीकरण करत गोल्ड मेडल पटकावले. तसेच देव घैसास किर महाविद्यालयाच्या पथनाट्य संघाने प्रभावी सादरीकरण करत ब्रॉन्झ मेडल मिळवले. याशिवाय पोस्टर मेकिंग स्पर्धेत साईश्वरी दशवंतराव व रचना तेरवनकर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त करून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

पथनाट्य स्पर्धेसाठी देव घैसास किर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सुयोग बेंडल यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या यशाबद्दल प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत विभाग प्रमुख वैभव घाणेकर, प्रा. सानिका कीर व प्रा. वैभव कीर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button