रत्नागिरी

जिल्हास्तरीय ओपन तायक्वांडो स्पर्धेसाठी गणराज क्लब सज्ज

रत्नागिरी दि. ५ :- रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन मान्यतेने व संघ रत्नागिरी,यांच्या सहकार्याने आयोजित 19 वि क्युरोगी व 13 वि पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांडो स्पर्धा सन 2026-27 छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बॅडमिंटन हॉल रत्नागिरी या ठिकाणी दिनांक 06 ते 08 फेब्रुवारी 2026रोजी दरम्यान मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, तालुक्यांमधून सुमारे 650 खेळाडू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेसाठी गणराज क्लबच्या खेळाडूंची निवड करण्यात आली. यावेळी गणराज क्लब तायक्वांडो अध्यक्षा ॲड. सौ. पूजा प्रसाद शेट्ये, महिला प्रमुख प्रशिक्षक सौ आराध्य प्रशांत मकवाना, क्लब उपाध्यक्ष सौ साक्षी मयेकर, सचिव सौ रंजना मोंडूला प्रशिक्षक डॉक्टर मयुरेश नडगिरी, आदिती शिवगण, अनिकेत पवार, साहिल शिवगण, शीतल वांयगणकर, शर्मिला वराडकर, आशका रसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

या स्पर्धेसाठी गणराज क्लब तायक्वांडो क्लबचे खेळाडू रत्नागिरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून ओपन तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेला खेळणाऱ्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे – विधी दुबे, श्रीनय कदम, मीरा वांयगणकर, युबना संदे, नीरज मकवाना, तीर्था मकवाना, दुर्वा हातिसकर, श्राव्या वाडकर, मानस रहाटे, स्पर्श रेडीज, आध्या रसाळ, अनया वणजू, बरखा संदे स्वराली जाधव, शौर्या जाधव, आर्या वराडकर, अखिलेश वांयगणकर, विहान शेटये, अथर्व मुरकुटे, विहान घाग, अहना रसाळ, केशर शेरे, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर, समर्थ विचारे,आदया कवितके, श्रेष्ठा विलणकर आदीची निवड करण्यात आली

निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिदें, डायरेक्टर नवलाई ग्रुप, रत्नागिरीचे श्री राजेंद्र सावंत, क्लबच्या अध्यक्ष अँड सौ. पूजा प्रसाद शेट्ये, रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई प्रशांत सुर्वे, नगरसेवक सौ. पुजाताई दिपक पवार, नगरसेवक श्री. राजन शेट्ये, नगरसेवक श्री. सौरभ मलुष्टे, श्री. के. एस.पोवार क्लब उपाध्यक्षा सौ. साक्षी मयेकर, सदस्य श्री परेश मोडूंळा, सौ. स्नेहा मोरे, श्रीमती शलाका जावकर, सिनियर खेळाडूंनीसह पालक वर्ग सर्व नगरसेवक आदींनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button