
देवरूख दि. ३ (सुरेश सप्रे) :- बँक ऑफ इंडियाच्या 14 जिल्हाच्या अंतर्गत “आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा” दि. 6 ते 8 फेब्रुवारी 2026 च्या दरम्यान देवरुख येथे संपन्न होत आहेत.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 14 जिल्यातील बँक ऑफ इंडियाचे खेळाडू देवरुख सारख्या छोट्याश्या शहरात उपस्थित राहून आपल्या खेळाचे प्रदर्शन करणार आहेत. या 14 जिल्ह्यांमधून 6 संघाची निवड करून 54 पुरुष व महिला खेळाडू निवडले गेले आहेत. यामध्ये पुरुष – महिला ओपन सिंगल, पुरुष – महिला ओपन डब्बल व पुरुष – महिला सांघिक टीम साठी लढत होणार आहे. तीन दिवसात बँक ऑफ इंडियाच्या या खेळाडूंचा खेळ देवरुखवासीयांना पहायला मिळणार आहे.
गुरुवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता बँक ऑफ इंडिया रत्नागिरी झोनचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे व डेप्युडी झोनल मॅनेजर अंजनी आझाद या मिटिंग मध्ये खेळाडूंना सूचना व मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून खेळाची व बँकेची गनिमा वाढवून देवरूख करांची मन जिंकून खेळाचा आनंद मिळाला यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन देवरे यांनी केले आहे.
या मीटिंगला स्पर्धेचे चीफ रेफ्री नंदकुमार प्रभुदेसाई, सावंतवाडी व सहाय्यक रेफ्री दिलीप विंचू हे काम पाहणार आहेत.
या बॅडमिंटन स्पर्धा सुलभाताई आपटे क्रीडा अकॅडमी, देवरुख येथे बॅडमिंटन संगमेश्वर तालुका असोशिएशन या मान्यताप्राप्त संघटनेच्या देखरेखीखाली होणार आहेत.
या सर्व कार्यक्रमाचे नियोजन बँक ऑफ इंडिया आंचालिक क्रीडा समिती रत्नागिरी करत असून त्याचे अध्यक्ष नरेंद्र देवरे झोनल मॅनेजर, खजिनदार विनोद कदम देवरुख व सचिव किरण खोपडे रत्नागिरी यांनी केलेले आहे.



