रत्नागिरी

देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना मौन पाळून आदरांजली

रत्नागिरी, दि. ३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 2 मिनिटे मौन पाळून आज आदरांजली वाहण्यात आली.

अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विश्वजीत गाताडे, प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मौन सुरु होण्यापूर्वी सकाळी ठिक १०.५९ ते ११ वाजता इशारा भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर ११.०३ वाजता मौन संपल्या संबंधिताचा इशारा भोंगा वाजविण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी रोजी २ मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button