क्षत्रिय मराठा मंडळाचा हळदीकुंकू समारंभ पारंपरिक पद्धतीने साजरा

रत्नागिरी दि. २९ : प्रतिवर्षीप्रमाणे येथील क्षत्रिय मराठा मंडळाच्या महिला समितीच्या सर्व समाज बांधवांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे आयोजन करण्यात आले. समारंभाची सुरुवात श्री तुळजाभवानी मातेच्या पूजन करून तिला वाण अर्पण करून करण्यात आली.

यावेळी विविध खेळ, स्पर्धा, आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र रत्नागिरीतील ब्युटीपार्लर उद्योजिका सौ. सुनीता सावंत यांचे अपघाती निधन झाल्याने या कार्यक्रमाला दुःखाची झालर होती. त्यामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. सुनिता साळवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या हळदीकुंकू समारंभाला मराठा समाजातील भगिनी उपस्थित होत्या. महिलांनी एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण, मंडळात नवीन सदस्य करणे, तसेच व्यावसायिक विचार मंडळाच्या पुढील वाटचालीविषयी विचारविनिमय करण्याबाबत महिलांनी विशेष उत्साह दाखवला. रत्नागिरीच्या नगराध्यक्षा व मंडळ भगिनी सौ. शिल्पाताई सुर्वे उपस्थित राहिल्या. त्यांनी महिलांशी संवाद साधला व महिलावर्गाचा उत्साह आला.



