रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळ सिमेंट ट्रक पलटी; वाहतूक ठप्प!

रत्नागिरी दि. २८ : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळ बुधवारी २८ रोजी सिमेंट वाहून नेणारा मोठा ट्रक पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सिमेंटची पोती घेऊन जाणारा ट्रक हातखंबा शाळेच्या परिसरातील वळणावर आला असता चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. ट्रक रस्त्याच्या मधोमध आडवा झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालक आणि क्लिनर सुखरूप आहेत. अपघाताच्या वेळी आसपास अन्य कोणतेही वाहन किंवा पादचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, महामार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

प्रशासनाने तातडीने हालचाली करत सध्या संथ गतीने एकेरी वाहतूक सुरू केली आहे. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे. प्रवाशांनी संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button