रत्नागिरी

सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेच्या विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार

संगमेश्वर दि. २३ ( प्रतिनिधी ):- कलासंचालनालय, मुंबईच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट, सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. यामध्ये प्रथमेश गोंधळी याने राज्यात दुसरा क्रमांक, विशाल गोवळकर याने राज्यात चौथा क्रमांक पटकावला असून, गौरव वाकचौरे याला गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. या प्रदर्शनासाठी व्यावसायिक व विद्यार्थी असे दोन विभाग असतात. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या कलाकृतीची निवड होणे ही कलाक्षेत्रातील अत्यंत गौरवाची बाब मानली जाते.यावर्षीच्या प्रदर्शनासाठी महाविद्यालयातील व्यावसायिक विभागातून शिल्पकार प्रा. रुपेश सुर्वे यांची निवड झाली असून, विद्यार्थी विभागातून एकूण २४ विद्यार्थ्यांच्या २६ कलाकृतींची निवड झाली आहे.

विशेष म्हणजे, घवघवीत यश संपादन करणाऱ्या या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक व वर्गशिक्षक प्रा. रुपेश सुर्वे आणि प्रा. विक्रांत बोथरे यांना दिले आहे. या दोन्ही प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आणि मेहनतीमुळेच हे यश साध्य करता आल्याचे विद्यार्थ्यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबरोबरच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचेही सर्वत्र विशेष कौतुक होत आहे.

सांगली येथे संपन्न होणाऱ्या या ६३ व्या राज्य प्रदर्शनात सह्याद्रिच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती झळकणार आहेत.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे मूलभूत अभ्यासक्रम: रुद्र शिवगण, कलाशिक्षक पदविका प्रथम वर्ष: शुभम लिबे, कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष: नवाज हमदुले, तन्वी गोरीवले, सोनल घाणेकर, श्रावणी कुळे.रेखा व रंगकला विभाग: सौरभ साठे

शिल्प व प्रतिमानबंधकला विभाग: चैतन्य मांडवकर, शिवम नलावडे, संकेत गोरीवले, राज कुंभार, गौरव वाकचौरे, साहिल परुळेकर, विशाल गोवळकर, सोहम धामणस्कर, प्रथमेश गोंधळी, यशोदीप घुले, मिथिल आंगचेकर, आदित्य खर्डे, विराज खाडे, रुचित सांगळे, आयुष दहिवलकर, ज्योती पांचाळ.सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, सेक्रेटरी महेश महाडिक, सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सर्व संचालक,ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सौ. पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम, प्राचार्य माणिक यादव व समस्त प्राध्यापक वृंद यांनी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button