रत्नागिरी

देविहसोळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी दि. २३ : ग्रामदेवता श्री आर्यादुर्गा व श्री जाकादेवी मंदिर विश्वस्त संस्था, देविहसोळ यांच्या वतीने तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे व आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या सहकार्याने देविहसोळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. माघी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित या शिबिरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.

या शिबिरामध्ये नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, वातव्याधी तपासणी, स्त्रीरोग तपासणी, लहान मुलांची आरोग्य तपासणी, मानसिक आरोग्य समुपदेशन, हृदयविकार तसेच कर्करोगासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन करण्यात आले. आवश्यक रुग्णांना औषधोपचार व आयुर्वेदिक औषधेही देण्यात आली.

शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे चे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. माने , आरोग्य सहाय्यक बी जे कुंभार, सामुदाय आरोग्य अधिकारी एन पी गेजगे, देविहसोळ आरोग्य सेविका श्रीमती एस. बी. जाधव,

तसेच आशा सेविका श्रीमती एस. एस. नार्वेकर, श्रीमती आर.व्ही. भोवड, श्रीमती एस. आर. सांडये, श्रीमती एस. एस. पैकडे या आशा स्वयंसेविका तसेच वाहचालक आर.ए. सुतार तसेच निलेश विचारे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाचे योगदान दिले.

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा थेट उपलब्ध करून देण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरत असून,या माध्यमातून नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी आयोजक व आरोग्य विभागाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button