रत्नागिरी

भारत शिक्षण मंडळाचे देव – घैसास – कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय रत्नागिरीच्या रसायनशास्त्र आणि भूगोल विभागाने दिली जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळेला भेट

रत्नागिरी दि. २२ : दिनांक २२ : आज रोजी रसायनशास्त्र विभाग आणि भूगोल विभागाच्या वतीने पोमेंडी, रत्नागिरी येथील महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी प्रयोगशाळेला भेट देण्यात आली. या क्षेत्रभेटीमध्ये उप कृषी अधिकारी श्री. रवींद्र खरात सर यांनी सर्वप्रथम मृदा नमुना संकलन, मृदेतील आवश्यक घटक, मृदेतील आवश्यक सेंद्रीय घटकांचे प्रमाण या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या शेतीबद्दलच्या सर्व शंकांचे निरसन केले.

त्यानंतर मृदा चाचणी प्रयोगशाळेतील उपकरणांबद्दल माहिती देण्यात आली. यामध्ये pH मीटर, कंडक्टोमीटर, फ्लेम फोटोमीटर, हॉट एअर ओव्हन, स्पेक्ट्रॉफोटोमीटर, डिस्टीलेशन युनिट, नायट्रोजन अनालायझर याविषयी आणि त्यावर मृदा परीक्षण कसे केले जाते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. मृदा चाचणी हा नवीन शैक्षणिक धोरणा नुसार अभ्यासक्रमातील एक घटक असल्याने विद्यार्थ्यांना या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून खूप माहिती मिळाली.

मृदा सर्वेक्षण प्रयोगशाळेतील सौ. सुषमा कदम (सहाय्यक कृषी अधिकारी), श्री. योगेश वेल्हे (उप कृषी अधिकारी), सौ. शोभा रानबरे (सहाय्यक कृषी अधिकारी), श्री.जयवंत सर्जे (सहाय्यक कृषी अधिकारी), कु. दिक्षा मयेकर (मृदा विश्लेषक) यांनी उत्तम पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली.

जिल्हा मृदा सर्वेक्षण आणि मृदा परीक्षण कार्यालय/अधिकारी डॉ. सारिका पाटील यांनी विद्यार्थ्यांना महाविस्तार -AIअँप विषयी माहिती दिली आणि नोंदणी करून घेतली. या क्षेत्र भेटी मध्ये भूगोल विभाग प्रमुख सहा. प्रा. ऋतुजा भोवड, सहा. प्रा. रसायनशास्त्र विभाग प्रमुख सहा.प्रा. आसावरी मयेकर व सहा. प्रा मिथिला वाडेकर उपस्थित होत्या. ही क्षेत्रभेट उत्तमरीत्या पार पडली. या क्षेत्र भेटीसाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button