रत्नागिरी

पटवर्धन हायस्कूलचा शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

राज्य गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी झळकण्याची परंपरा कायम; अनिहा सुर्वे राज्य गुणवत्ता यादीत चमकली

संगमेश्वर दि. २२ ( प्रतिनिधी ):- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षेमध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांमध्ये पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरीने उज्वल यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातील एक विद्यार्थ्यी राज्य गुणवत्ता यादीमध्ये चमकली आहे. तब्बल ८१ विद्यार्थ्यांनी अ व ब श्रेणी प्राप्त केली आहे.

इंटरमिजिएट परीक्षेला एकूण ४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते ते सर्व उत्तीर्ण झाले असून निकाल शंभर टक्के लागला आहे. इंटरमिजिएट परीक्षेत अनिहा विनय सुर्वे हि राज्य गुणवत्ता यादीत ६७ वी आली. इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेमध्ये आर्या हरिश्चंद्र गोडबोले, आयुष्य गुरुप्रसाद चौगुले, अनिहा विनय सुर्वे सुर्वे, चैतन्या दिलीप देवरुखकर, इशा योगेंद्र वायंगणकर, गार्गी मिलिंद लोटणकर, गीता रवींद्र गायकवाड, हर्षा दिवाकर तोडणकर , मधुरा संजय पाटील, मृण्मय महेश आरेकर, मृण्मयी मंगेश पांचाळ, नंदिता मनोज हळदणकर, नित्या संदिप फणसे, प्रतिज्ञा जितेंद्र सावंत, सानिका रुखमण्णा अल्लोळकर, सारा स्वप्नील वायंगणकर, श्रद्धा चंद्रकांत कोठणकर, श्रिया ज्ञानेश्वर राऊत, श्रीयांश प्रशांत रसाळ, स्वरा निलेश वैद्य, स्वरा प्रीतम बनप, स्वराज दीपक साळुंखे, तनया राजेंद्र भाटकर, तन्मय संतोष देसाई, तनवी योगेश सागवेकर, वैदेही सचिन सावंतदेसाई, वरद मनोजकुमार खानविलकर या २७ विद्यार्थ्यांना अ श्रेणी आणि ०९ विद्यार्थ्यांना ब श्रेणी प्राप्त झाली आहे.

एलिमेंटरी ड्रॉईंग परीक्षेला प्रविष्ट झालेले ६८ पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल शंभर टक्के लागला आहे. या परीक्षेत ओंकार केळकर, अंश मंगेश भावे, अनुष्का धनंजय कुलकर्णी, अन्वय संतोष कुळेकर, अर्णव संदेश शहाणे, आर्या अविनाश रहाटे, अवनी सचिन नागवेकर, दत्तात्रय राजन नार्वेकर, दूर्वा सुधीर लाड, कार्तिकी प्रकाश भुरवणे, खुषी विद्याधर कांबळे, रिद्धी संदेश नागवेकर, सानवी दिनेश वाडेकर, श्लोक संतोष जोशी, श्रावणी तेजस शेडेकर, श्रील विलास मांजरेकर, श्रीशा श्रीकृष्ण कोतवडेकर, स्वराज सचिन भाटकर, तितीक्षा नंदकुमार जाधव, वैष्णवी सुधाकर शिनगारे, वेदा विजय लिंगायत, अर्पिता धनंजय मिराशी या २२ विद्यार्थ्यांना अ श्रेणी व २३ विद्यार्थ्यांना ब श्रेणी प्राप्त झाली आहे.

इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी शाळेचे उपमुख्याध्यापक कलाशिक्षक रुपेश पंगेरकर व एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी कला शिक्षिका मुग्धा पाध्ये यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे, पर्यवेक्षिका कल्पना शिरोळकर व संस्थेचे कार्यवाह धनेश रायकर, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, अध्यक्ष नमिता कीर, खजिनदार नित्यानंद भुते तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button