संगमेश्वर तालुक्यात १३ उमेदवारी अर्ज दाखल
उबाठाच्या नेहा माने व शिवसेनेचे विलास चाळके यांचे उमेदवारी अर्ज दाखल

देवरूख दि. २० (सुरेश सप्रे) :- संगमेश्वर तालुक्यात ७ जिप गट व सहा पंचायत समिती गण असे १३अर्ज दाखल केले आहेत. संगमेश्वर तालुक्यात महायुती झाली असून जागा वाटप अंतिम टप्प्यात आले असुन भाजपाच्या वाट्याला कडवई व साडवली हे दोन जिप गट आले आहे.तर कोसुंब गटातील जागेबाबतीत अजून अंतिम फैसला झालेला नसल्याने या गटासह काही गणात भाजपात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज उबाठा शिवसेनाच्यावतीने माजी मंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी सौ. नेहा माने यांनी साडवली, सौ. मुग्धा जागुष्टे कोसुंब व संतोष थेराडे कडवई गटातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर कोसुंबमधून राष्ट्रीय काँग्रेस कडून चंद्रकांत मोरे व कडवई तून आषिश अनंत सुर्वे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर हातीव पं. स गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून मंगेश बांडागळे यांनी तर उबाठाचे प्रदीप ढवळे यांनी तर धामणी गणातून उबाठा शिवसेनेचे काशिनाथ लाखण व अपर्णा जाधव कडवई गण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उद्या दुपारी ३ वाजता नामांकन भरणेचा शेवटचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उद्या जे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत त्यांनी आपली सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दुपारी २.५५पर्यंत कक्षात दाखल होतील अशांना कक्ष बंद करून सर्वांनाच टोकन दिले जाणार आहे. त्यांनंतर कक्षातील उपस्थित उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातील. तीन वाजले नंतर उमेदवारांना कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. यांची नोंद सर्व पक्षांच्या उमेदवारांनी घेवून आपले उमेदवारी अर्ज वेळेत दाखल होतील यांची दक्षता घ्यावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.



