रत्नागिरी

रत्नागिरी नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

रत्नागिरी दि. २० :- रत्नागिरी नगर परिषदेच्या विविध  विषय समितीच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. नगर परिषदेत महायुतीचे वर्चस्व असल्याने ही प्रक्रिया बिनविरोध पार पडली.

या प्रक्रियेत उपनगराध्यक्ष यांचेकडे शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक समिती राहणार असून, श्री. समीर जगन्नाथ तिवरेकर हे या समितीचे सभापती राहणार आहेत.

तसेच सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी – श्री. संतोष दत्तात्रय कीर, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी श्री. निमेश विजय नायर, स्वच्छता वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी श्री. राकेश चंद्रकांत नागवेकर, नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी श्री. सुहेल अब्दुल लतीफ साखरकर तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी श्रीम. प्रिती रविंद्र सुर्वे व उपसभापती पदी पूजा दीपक पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या निवडीनंतर शिवसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर, जेष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी नूतन सभापतींचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button