रत्नागिरी

युवकांनी आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी- कौस्तुभ सरदेसाई

डीजीके कॉलेजमध्ये युवा दिन साजरा

रत्नागिरी दि. २१ : युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करून आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन कौस्तुभ सरदेसाई यांनी केले. देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमात बोलत होते.

महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले होते. स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रास्ताविक आजीवन अध्ययन विस्तार विभाग प्रमुख प्रा. वैभव घाणेकर यांनी केले. याप्रसंगी प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. राखी जाधव, महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आकाश रणसे याने केले. आभार ईश्वरी पवार हिने मानले.

दरम्यान, स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील उपस्थित होते. या वेळी निलाक्षी राऊत आणि सानिका गावडे यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती सांगितली.

प्रमुख अतिथी आर. आर. पाटील यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्याविषयी प्रेरणादायी विचार सांगितले. जिल्हा विधी प्राधिकरणाची सविस्तर माहिती सांगितली. रस्ता सुरक्षाबाबतचे नियम आणि माहिती देखील सांगितली. या वेळी कला विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. राखी साळगावकर, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन तन्वी पटवर्धन हिने केले. शिवानी पाटील हिने आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button