रत्नागिरी

रत्नागिरीत २९ दिव्यांगांना मिळणार आधुनिक ‘नियोमोशन’ ई-वाहने

उद्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या उपस्थितीत वितरण

रत्नागिरी दि. २९ जुलै :- जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या रोजगाराला गती देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास सुकर करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून रत्नागिरी जिल्ह्यातील २९ गरजू दिव्यांगांना अत्याधुनिक ‘नियोमोशन’ (NeoMotion) ई-वाहनांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

हा वितरण सोहळा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्रीमंत वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभहस्ते पार पडणार आहे. हुंदाई मोबीस यांच्या CSR head रोशिना या येणार आहेत.

उपक्रमाची मुख्य वैशिष्ट्ये:

स्वावलंबन आणि रोजगार: या ई-वाहनांमुळे दिव्यांगांचा दैनंदिन प्रवास सुकर होणार असून, त्यांना व्यवसाय, शिक्षण, अथवा नोकरीसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.

आयआयटी मद्रास तंत्रज्ञान: ‘नियोमोशन’ हे तंत्रज्ञान साध्या व्हीलचेअरचे काही सेकंदांत रस्ता-प्रवासासाठी योग्य अशा इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर करते.

सीएसआर भागीदारी: हुंदाई मोबीस कंपनीने सामाजिक दायित्व जपत रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या आर्थिक व सामाजिक पुनर्वसनासाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button